Ad will apear here
Next
थ्री-डी प्रिंटरने तयार केला जबडा..
लंडन : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे लंडनमध्ये चक्क एका ५३ वर्षांच्या व्यक्तीचा जबडा थ्री-डी प्रिंटरच्या साह्याने तयार करण्यात यश आले आहे. तेथील भारतीय वंशाच्या शल्यविशारदाने ही कामगिरी केली आहे. संबंधित रुग्णाच्या एका पायाच्या हाडाचा वापर जबडा तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. 

डॉ. दया गहीर असे या शल्यविशारदाचे नाव असून, इंग्लंडमधील पश्चिम मिडलँड रॉयल विद्यापीठ रुग्णालयात ते कार्यरत आहेत. रुग्णाचा चेहरा, डोके आणि मानेच्या शस्त्रक्रिया करण्यात डॉ. दया यांचा विशेष हातखंडा आहे. दर वर्षी ते सुमारे ४० अवयवांची पुनर्रचना करतात. या थ्री-डी प्रिंटरमुळे डॉ. दया यांचे काम अधिक सुलभ झाले आहे.

‘शस्त्रक्रियांसाठी लागणारे साहित्यही या थ्री-डी प्रिंटरच्या माध्यामातून तयार केले जाते. तसेच शस्त्रक्रियेमध्येही त्याचा उपयोग केला जातो,’ अशी माहिती डॉ. दया गहीर यांनी स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना दिली. ब्रिटनमधील रॉयल हॉस्पिटलकडेच अशा प्रकारचा थ्री-डी प्रिंटर आहे. तंत्रज्ञानाची ही प्रगती आ वासून पाहण्यासारखीच आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZYZBB
Similar Posts
कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे ‘जीमेल’चे ‘नज’ फीचर जीमेल वापरकर्त्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी फीचर्समध्ये बदल करून सुविधा देणाऱ्या गुगलने जीमेल वापरकर्त्यांसाठी नुकतेच एक नवीन फीचर उपलब्ध करून दिले आहे. सांगितलेल्या किंवा ठरवलेल्या वेळेत ई-मेल करण्याची आठवण करून देणाऱ्या या नवीन फीचरला ‘नज’ फीचर असे नाव देण्यात आले आहे.
गूगलकडून टॉरंट होणार बॅन! टॉरंटफ्रिकच्या रिपोर्टनुसार गूगलनं हॉलिवूडमध्ये चालणाऱ्या पायरसीवर निशाणा साधत टॉरंट वेबसाईटवर बंदीचा निर्णय घेतला आहे. गूगलनं पायरसी विरोधात एक पाऊल पुढे टाकत टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.   गूगलसोबतच बिंग, याहू, यासारख्या सर्च इंजिनकडूनही टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्यात येणार आहे
संशोधकांनी क्वांटम क्‍लोनिंग मशिनची निर्मिती, "हॅकिंग फ्री' साठी कॉम्प्युटरच्या निर्मितीचे प्रयत्न होत असतानाच त्याचे हॅकिंग रोखणारे तंत्रज्ञानही विकसित करण्यात आले असून, हे कॉम्प्युटर सुरक्षित असतील, याची ग्वाही दिली आहे. नवे तंत्रज्ञान बाजारात येण्याआधीच त्याबाबतीत होणाऱ्या गैरप्रकारांचा अंदाज घेऊन समांतर संशोधन करण्याची संशोधकांची मानसिकता बनली आहे.   
'डिजिटल इंडिया'साठी ‘आधार’शी संलग्न स्काइप लाइट सेवा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर माय्रकोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी भारतीयांसाठी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. भारतासाठी 'आधार'शी संलग्न स्काइप

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language